OBC Leaders on Maratha Reservation : "मराठा समाज सामाजिक मागास कसा? ओबीसीमधील घुसखोरी बंद करा"
OBC Leaders on Maratha Reservation : "मराठा समाज सामाजिक मागास कसा? ओबीसीमधील घुसखोरी बंद करा"
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची मागणी आहे, मात्र मराठा समाजाला OBC तून आरक्षण देऊ नका असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. 15 दिवसात 1 कोटी 58 लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रम आहे. अहवालात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही, आजच शुक्रे समितिने अहवाल सादर केला, त्यात काय अजून माहिती नाही. राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावर प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलीय.





















