(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nilesh Lanke meet Gaja Marane :निलेश लंके गजा मारणे ची भेट, NCP दोन्ही गटाच्या नेत्यांची भूमिका काय?
Nilesh Lanke meet Gaja Marane :निलेश लंके गजा मारणे ची भेट, NCP दोन्ही गटाच्या नेत्यांची भूमिका काय? : अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांनी गुरुवारी गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे. खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्याता आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.
अमोल मिटकरी काय म्हणाले ?
हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता... आता तुतारी गटाचे शालीन वक्ते कुठे दबले आहेत. ज्यावेळी पार्थ पवारांनी गजा मारणेची भेट घेतली, त्यावेळी गदारोळ माजवला होता. त्यावेळी आजित पवारांनी चूक झाल्याचं मान्य केले होते. भेटायला नको होतं, असं दादांनी सांगितलं होतं. आज निलेश लंके सन्मानाने सक्तार स्वीकारत आहेत. बारामती अथवा अहमदनगर लोकसभामध्ये ज्या घडामोडी घडल्या, गुंडाचा वापर झाला, यामध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का ? हे तपासलं पाहिजे.. आम्ही सहज भेटलो तर रान उठवले जाते, असे निलेश लंके म्हणाले.