एक्स्प्लोर
Rupali Thombare Vs Ruplai Chakankar : ‘चुकीला माफी नाही, राजीनामा द्या’; चाकणकरांविरोधात रुपाली ठोंबरे आक्रमक
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातच अंतर्गत वाद उफाळून आला असून, पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'ज्या अध्यक्षा चुकलेल्या आहेत, चुकीला माफी नाही त्यांनी राजीनामा दिला पाहिजे,' अशी स्पष्ट भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केले आहे. पक्षातर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे चाकणकर यांच्यावरील दबाव वाढला आहे. चाकणकर यांच्या एका वक्तव्यामुळे पक्ष बदनाम झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांनी आपल्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना येत्या दोन ते तीन दिवसांत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे. राज्य महिला आयोग हे एक स्वतंत्र व्यासपीठ असून त्यांचे मत हे पक्षाचे मत नसते, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
जालना
क्रीडा
Advertisement
Advertisement
















