Nashik Ramkund : रामकुंड घाटावर होणाऱ्या बांधकामाला पुरोहित संघाचा विरोध
Nashik Ramkund : रामकुंड घाटावर होणाऱ्या बांधकामाला पुरोहित संघाचा विरोध नाशिकच्या रामकुंड येथील गोदाआरतीचा रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघाचा वाद हा टोकाला गेलाच पाहायला मिळत आहे. रामतीर्थ सेवा समितीच्या माध्यमातून अहिल्यादेवी घाट या ठिकाणी रामतीर्थ सेवा समितीच्या माध्यमातून बांधकाम करण्यात येत आहे या बांधकामाला विरोध दर्शवत पुरोहित संघाने हे बांधकाम करू नये बांधकाम करायचं असेल तर आमच्या डोक्यात येथे दगड घालून आम्हाला या ठिकाणी बळी द्या आम्ही हुतात्मा स्वीकारायला तयार आहोत अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या रामकुंड येथे पंचवटी पोलीस दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे...
हेही वाचा :
रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार.
महायुतीचा आज संध्याकाळी मेळावा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, तर आरोप करणारेच घोडेबाजार करतात, नाना पटोलेंचा पलटवार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा
विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी.
दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग...
पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर..३ ते १० वर्षांची शिक्षा तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद...मंंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक..