(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane Supporters Penguin Dance : नारायण राणेंचा विजय, राणे समर्थकांचा पेंग्विन डान्स
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झालाय. 24 व्या फेरीअखेर नारायण राणे 51 हजार 894 मतांनी आघाडीवर होते. नारायण राणे पाचव्या फेरीनंतर 4239 मतांनी आघाडीवर आहेत. पाचव्या फेरीनंतर विनायक राऊत पिछाडीवर पडले आहेत. राज्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हायहोल्टेज लढतीपैकी एक होता. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक विनायक राऊत यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळाली. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवाय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी सभा घेतली होती, त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती.
नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊतांनी बाजी मारली होती. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर विनायक राऊत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहिली. उद्धव ठाकरेंनी निष्ठा राखणाऱ्या विनायक राऊतांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जात असताना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा खेचून आणली होती. दरम्यान मतदानाचा निकाल (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result 2024) आता अवघ्या काही तासांवर असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.