Nanar Refinery : रिफायनरी प्रकल्पाबद्दल नाना पटोले आणि जयंत पाटील म्हणतात... ABP Majha
कोकणातल्या नाणारमधील गुंडाळण्यात आलेला रिफायनरी प्रकल्प आता राजापूर तालुक्यातील बारसू इथंच होणार असं निश्चित होऊ लागलंय. पण त्याचवेळी या प्रकल्पाच्या विरोधकांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. रिफायनरी विरोधात बारसू परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. रिफायनरी हटवा, कोकण वाचवा अशा घोषणा देत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात महिलांची लक्षणीय संख्या पाहायला मिळाली. रिफायनरीला विरोध करणारे बॅनर हातात घेऊन नागरिक या मोर्चात सहभागी झाले.. ठाकरे सरकार विरोधातही या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रिफायनरी प्रकल्पाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले पाहुया























