एक्स्प्लोर

Majha Vision 2021 : विरोधकांकडून Rahul Gandhi यांचा नाही तर देशाच्या विकासाचा अपप्रचार : Nana Patole

#NanaPatole  #MajhaMaharashtraMajhaVision #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन

Majha Maharashtra Majha Vision : राज्यात शहरातला विकास आणि ग्रामीण भागातला विकास यामध्ये मोठी विषमता आढळते. त्यामुळे राज्याचा समान विकास होणं आवश्यक आहे. राज्यातली शेती निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहिला. समान विकास व्हायचा असेल तर राज्यातल्या नद्या जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात 'नदी जोडो' प्रकल्पावर भर आणि असमान विकास दूर करण्यासाठी प्रयत्न हेच काँग्रेसचे व्हिजन असणार आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जगातल्या अनेकांनी सांगितलं की वेगवेगळ्या धर्मांचा हा भारत देश एकसंध राहू शकणार नाही. पण आजही भारत एकसंध राहिला आहे. देशाच्या एकत्रिकरणामध्ये, लोकशाही टिकवण्यामध्ये काँग्रेसची महत्वाची भूमिका असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. देशातल्या लोकांना लोकशाहीमध्ये सामिल करण्यामध्ये आणि लोकशाही बळकटीकरणामध्ये काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावल्याचंही त्यांनी सांगितलं.  

केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करतंय
नाना पटोले म्हणाले की, "राज्यात एकाच वर्षी कोकणात वादळ आलं, पूर आला आणि कोरोनाचे संकट आले. या काळात पंतप्रधानांनी इतर राज्यांना भेटी दिल्या पण महाराष्ट्राला कधीही भेट दिली नाही. एनडीआरएफच्या माध्यमातून राज्याला मदत मिळाली नाही. कोरोना काळातही केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव केला. रेमडेसिव्हर असेल किंवा लसी असतील, केंद्राने नेहमीच हात आखडता घेतला. तरीही महाविकास आघाडीने राज्यात चांगलं काम केलं."

बेरोजगारी ही समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. त्यामुळे आता शेतीवर आधारित उद्योग उभारण्याची गरज आहे. कृषी संदर्भात केद्र सरकारची चुकीची धोरणं शेतकरी आणि या क्षेत्राच्या विकासाला बाधा आणत असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करणे अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले.

रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणं हे कांग्रेसचं व्हिजन असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. नाना पटोले म्हणाले की, "रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणं ही आताची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. राजीव गांधींनी कम्पुटर सुरु केलं म्हणून त्याची फळं आज आपण चाखतोय. आजचा भारतीय तरुण जगभरात यशस्वी होतोय. अशीच व्यवस्था येत्या काळात गावागावात उभी करण्याचा संकल्प काँग्रेसचा आहे."

आरोग्य व्यवस्थेच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचं सांगत नाना पटोले म्हणाले की, "काँग्रेसने उभारलेली आरोग्यव्यवस्था सध्या तोकडी पडतेय. त्या काळी काँग्रेसने एम्ससारख्या संस्था उभारल्या, गावागावात प्राथमिक आरोग्य केंद्रं उभारली. पण आताच्या काळात त्यामध्ये अजून विकास करण्याची गरज असल्याचं कोरोना काळात प्रकर्षानं जाणवलं. त्यामुळे येत्या काळात राज्यात आरोग्य व्यवस्था ही अजून सक्षम करण्यावर काँग्रेस भर देईल."

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget