Nagpur Turkey Booking Cancell: पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कीचे 60टक्के पर्यटकांकडून बुकिंग रद्द
Nagpur Turkey Booking Cancell: पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कीचे 60टक्के पर्यटकांकडून बुकिंग रद्द
भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर भारतीयांचा मोठा रोष तुर्की आणि अझरबैजान देशांवर दिसतो आहे. उघडपणे पाकिस्तानला मदतीसाठी दोन्ही देश पुढे आल्याने पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांनी हात आखडता घेतला आहे. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक कंपन्यांनी अझरबैजान आणि तुर्कीचे बुकिंग रद्द केले आहे… सोबतच, पर्यटकांकडून देखील पुढे येत बुकिंग रद्द करण्यास कंपन्यांना सांगितले आहे… केसरी टुर्सकडून देखील आपले अझरबैजान आणि तुर्कीसाठीचे सर्व टूर्स रद्द केल्याची माहिती संचालक हिमांशु पाटील यांनी दिली आहे.भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईघाईत न विचारता केलेल्या मध्यस्थीवर 'न्यूयॉर्क टाईम्स'दैनिकाने टीका केली आहे. दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल पारितोषिक मिळवण्याची घाई झाल्याची चर्चा रंगली आहे, असेही न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला असेही न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात म्हटले आहे. खरंतर आधी अमेरिका या प्रश्नात पडण्यास इच्छूक नव्हता. मात्र, भारताने पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र भांडारावर (Nuclear Weapons) मारा केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी यात लक्ष घातलं आणि युद्धविरामाची घाई केली, असे या लेखात म्हटलंय. भारत हा राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आला आहे. भारत अनेक शस्त्रास्त्र अमेरिकेकडून खरेदी करतो. तरी जेव्हा पाकिस्तनचा प्रश्न येतो तेव्हा मात्र चीन (China) आणि अमेरिका एकाच पेजवर येतात, असे 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या लेखात म्हटले आहे.






















