Nagpur Congress Protest : महिला काँग्रेसचे नागपूरात नारी न्याय आंदोलन
महिला काँग्रेस चे नारी न्याय आंदोलन नागपुरात सुरू झाले आहे... महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा बोलत आहे... काँग्रेस नेते मुकुल वासनिक, नाना पटोले, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी हे आंदोलनाला साथ देण्यासाठी पोहोचले आहे.. बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून सर्व नेते मंचावर पोहोचले आहे .. महिला काँग्रेस कडून सर्व नेत्यांना लाल चूनरी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले... अल्का लांबा - राष्ट्रपती मुर्मु म्हणतात मी चिंतित आहे, मला भय वाटते.. ज्या देशाची राष्ट्रपती घाबरलेल्या असतील, त्या देशातील महिलांचे काय होणार.. मुर्मू जी घाबरु नका आणि आपल्या पदाचा वापर करून महिलांना धीर द्या.. आता खूप झाले.. कोणी आमचे रक्षण करेल, याची वाट आम्ही पाहणार नाही... Pm मोदी तुम्ही दहा वर्ष गुन्हेगारांना वाचवण्याचे काम केले.. ब्रिजभूषण सिंह ला कोणी वाचवले... महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले आहे.. त्यामुळे राजकीय महिला आरक्षण लागू करावे अशी आमची मागणी आहे... तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये ही 50 टक्के महिला आरक्षण लागू करावे अशी आमची मागणी आहे.. अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ही आमची ही मागणी आहे... महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला न्याय कमिटी स्थापन करणार, त्यात एक वकील, एक डॉक्टर कार्यकर्ता राहणार ... पीडित महिलांना जर त्यांचे FIR नोंदवले जाणार नसेल तर त्यांनी महिला काँग्रेसच्या महिला न्याय कमिटी कडे येऊन तक्रार देता येईल... नाना पाटोले - बदलापूर ची ती शाळा आपट्यांची होती.. ती आरएसएस ची शाळा होती.. तिथून पुरावे नष्ट केले, cctv गायब केले.. भाजप चा सरकारी भाडोत्री वकील उज्ज्वल निकम मुलींना झालेली इजा सायकल चालवताना झाली असे सांगून दिशाभूल करत आहे... मालवण मधील मूर्ती बनवणारा ही आपटे च होता.. त्याने मूर्ती बनवताना अनेक चुका केल्या होत्या... महात्मा गांधींच्या खुनात ही आपटे होते... आरएसएस मध्ये महिलांना स्थान नाही... हवामान विभाग म्हणते मालवण मध्ये तशी 26 km गतीचा वारा होता.. cm म्हणतात ताशी 40 km चा वारा होता... रश्मी शुकलांच्या माध्यमातून आरएसएस चा एजेंडा भाजप चालवत आहे.. देवेंद्र आणि नरेंद्र दोघांनी राज्य आणि देशाला शब्दांनी बुद्धू बनवण्याचे काम केले आहे.. आता या सरकारला बुद्धू बनवण्याची वेळ आली आहे... महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर चे राज्य असून याच महाराष्ट्राने सर्वाधिक योगदान देत इंडिया आघाडीसाठी सर्वात जास्त जागा जिंकून दिल्या.. महाराष्ट्रातील सरकार शेतकरी, महिला, मजूर, गरीब विरोधी सरकार आहे.. याला सत्तेतून हटवण्याची गरज आहे... लोकसभा निवडणुकांमध्ये जसं जास्त महिलांना उमेदवारी दिल्या, तसच विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना जास्तीत जास्त उमेदवारी देणार आहे.. मात्र, त्यासाठी महिलांनी जमिनीवर काम केले पाहिजे आणि त्यांचे काम काँग्रेस पक्षाकडून केल्या जाणाऱ्या सर्व्हे मध्ये दिसला पाहिजे... मुकुल वासनिक महिलांना सुरक्षित करण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करावं लागेल... मात्र ते मोदी सत्तेत असे पर्यंत होऊ शकत नाही, कारण मोदी आरएसएस मध्ये तयार झाले आहे... आणि महिला आरएसएस च्या सदस्य होऊ शकत नाही.. त्यासाठी राष्ट्र सेविका समितीत जावे लागते.. महिला स्वंयसेवक होऊ शकत नाही.. महिलांना आरएसएस मध्ये दुय्यम स्थान दिले जाते... नाना भाऊ विधानसभा निवडणुकांसाठी पुरुष आणि महिलांच्या अर्जाना निरपेक्ष पद्धतीने तपासा.. मी असे म्हणत नाही की महिलांना ग्रेस मार्क द्या, मात्र त्यांच्या कामाचा निरपेक्ष विचार करा, असे झाले तर मोठ्या संख्येने महिलांना विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळू शकेल...