एक्स्प्लोर
Voter List Scam: 'निवडणूक आयोग BJP चा पार्टनर म्हणून काम करतोय', MVA चा सरकारवर घणाघात
मुंबईत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेने (MNS) मतदार यादीतील (Voter List) घोळ आणि मतचोरीच्या (Vote Theft) आरोपांवरून निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) इशारा मोर्चा काढला. 'मतचोरीमुळे सरकारने बेईमानी करून सत्ता बळकावली, हे आता सिद्ध झालंय,' असा थेट आरोप मोर्च्यातील नेत्यांनी केला. विरोधकांच्या मते, बोगस मतदार (Bogus Voters) तयार करून निवडणुका जिंकण्याचा नवा फंडा देशात सुरु झाला असून, निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा (BJP) पार्टनर म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. EVM मध्ये घोटाळे करून आणि मतदार याद्यांमध्ये त्रुटी ठेऊन लोकशाही धोक्यात आणली जात आहे, त्यामुळे याद्या दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. दुसरीकडे, हा मोर्चा स्वार्थासाठी काढल्याचा आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करण्याचा प्रकार असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याची एक प्रक्रिया असते, पण ती माहिती न घेताच उगाच आयोगावर आक्षेप घेतले जात असल्याचे प्रत्युत्तर देण्यात आले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















