Mumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रम
Mumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रम
मुंबई: मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील (Gateway Of India Boat Accident) समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवास होते. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते. यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती. पण आता या अपघातामध्ये तीन प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण 130 जणांची क्षमता या बोटीची होती. सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाश्यांचं बचावकार्य पूर्ण झालं आहे. तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असंही म्हटलं जातंय. या बोटीमध्ये लहान मुलं, अनेक कुटुंब होती.
प्राथमिक माहितीनुसार, ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर बोट अचानक बुडाली. JOC येथून प्राप्त माहितीनुसार एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी नौदल, JNPT, Coast guard, यलोगेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती. याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे. यासाठी 40 ते 45 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. 3.30 च्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर 5 ते 8 किमी आतमध्ये ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिली.