एक्स्प्लोर
Fake Encounter: 'हे फेक एन्काउंटर आहे', वकील नितीन सातपुतेंचा पोलिसांवर गंभीर आरोप, प्रकरणाच्या चौकशीची मागणी
मुंबईतील पवई (Powai) येथे एका स्टुडिओमध्ये रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने १७ मुलांना ओलीस ठेवले होते, ज्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. या एन्काउंटरवर आता वकील नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'हे फेक एन्काउंटर आहे', असा थेट दावा अॅडवोकेट नितीन सातपुते यांनी केला आहे. पोलिसांनी रोहितला पायात गोळी मारून नियंत्रणात का आणले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रोहित आर्य हा एकेकाळी 'मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा' या सरकारी योजनेचा पोस्टर बॉय होता आणि त्याने केलेल्या कामाचे पैसे सरकारकडून थकल्याचा आरोप आहे. याच कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणामुळे कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















