Mumbai Ganpati : ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं जल्लोषात आगमन, गणेश भक्तांची गर्दी
Mumbai Ganpati : ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं जल्लोषात आगमन, गणेश भक्तांची गर्दी
मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी 'बेस्ट' उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ मार्गांवर २४ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती 'बेस्ट' च्या सूत्रांनी दिली. या बस ७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 'बेस्ट' उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा दिली होती. यंदा राज्य सरकारच्या सूचनेनुसार दहा दिवस बस सेवा देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे बस क्र. मार्ग ४ लि. - डॉ. एम. इक्बाल चौक ते ओशिवरा आगार ८ लि. - जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर टर्मिनस ए-२१ - डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार ए-२५ - बँकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन) - ए-४२ - पं. पळुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) ते सँन्डहर्स्ट रोड स्थानक ४४ - वरळी गाव ते एस. यशवंतराव चौक (काळाचौकी) ५१ - इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रुझ आगार ६९ - डॉ.एस.पी.एम चौक (म्युझियम) ते पी.टी. उद्यान, शिवडी ६६ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राणी लक्ष्मीबाई चौक (शिव)