MNS Vidhansabha : राज ठाकरेंनी मतदारसंघ निहाय आढावा घेतल्यानंतर मनसेचा मेळावा
आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसेच्या तयारीला वेग आला आहे. मनसे स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकीचा आढावा घेऊन सव्वा 200 पर्यंत जागा लढण्याचा विचार मनसेचा आहे. या विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याचा दौरा देखील करणार आहेत. काय नक्की मनसेचं विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सुरू आहे या संदर्भात मनसेचे वैभव खेडेकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी TT पॉईंट्स महाराष्ट्राच्या या राजकारणापासून आमचा पक्ष दूर आहे सर्व विधानसभा मतदार संघाचा आढावा साहेबांनी घेतला आम्ही विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत आमच्यातले अनेक चेहरे हे विधानसभा निवडणूक लढवतील महाराष्ट्रात मनसेला आशादायी चित्र आहे हे एकंदरीत आढावा घेतल्यानंतर समजतंय 288 जागांचा आढावा हा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातील सव्वा 200 जागा लढण्याचा विचार आमचा आहे सातत्याने मॅरेथॉन बैठका निवडणुकीत दृष्टीने सुरू आहेत 25 तारखेला राज्यातील सर्व पदाधिकारी यांचा मेळावा मुंबईत होणार आहे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्या दरम्यान राज साहेबांचा राज्यात दौरा होईल महाराष्ट्रातले हे सरकार एक कंपनी आहे या कंपनीत तीन भागीदार आहेत,त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही