एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी अन् 5 कोटीची खंडणी; वासनांध अशोक खरातवर तीन गुन्हे दाखल, राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता तपास थेट...

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, राज्य शासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, राज्य शासनाने (Maharashtra Government) या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी मोठा निर्णय घेतला आहे. वासनांध कृत्ये, अश्लील व्हिडिओंची धमकी आणि कोट्यवधींच्या खंडणीच्या आरोपांमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने आता तपास थेट विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे.

कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित विविध गंभीर गुन्ह्यांचा तपास एकत्रित आणि प्रभावीपणे करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या SIT च्या प्रमुखपदी महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या आरोपांमुळे आणि विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याने महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने उच्चस्तरीय तपासाची गरज ओळखत हा निर्णय घेतला आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: तीन ठिकाणी स्वतंत्र गुन्हे

या प्रकरणात नाशिक शहर आणि जिल्ह्यासह इतर भागात एकूण तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सरकारवाडा पोलीस ठाणे येथे 35 वर्षीय महिलेच्या लैंगिक शोषणाची तक्रार, वावी पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण) येथे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आणि तब्बल ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आणि शिर्डी पोलीस ठाणे (अहिल्यानगर) येथे अश्लील फोटो व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही गुन्ह्यांमुळे प्रकरणाचे स्वरूप केवळ लैंगिक अत्याचारापुरते मर्यादित न राहता ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक गुन्ह्यांपर्यंत विस्तारले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: तपासाची सूत्रे SIT कडे

राज्य शासनाच्या आदेशानुसार संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना या प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि केस डायरी तात्काळ SIT कडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, तपासाची प्रगती नियमितपणे वरिष्ठ स्तरावर सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे तपासावर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने बुधवारी पहाटे कारवाई करत अशोक खरात याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली असून, या डिजिटल पुराव्यांमुळे तपास अधिकच गंभीर झाला आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: मोठे खुलासे होण्याची शक्यता

धार्मिक आस्था आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून अत्याचार केल्याच्या आरोपांसोबतच ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचे गंभीर आरोप समोर आल्याने या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. SIT मार्फत होणाऱ्या सखोल तपासामुळे आणखी पीडित पुढे येण्याची आणि अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी आखला वेगळाच प्लॅन, परिसरात चोर घुसल्याचा बनाव केला अन्...; कारवाईबाबत मोठी माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget