एक्स्प्लोर
MNS On Voter List Fraud मतदार यादीत घोळ, नेस्को सेंटरमध्ये मनसेचा मेळावा; महापालिकांसाठी जय्यत तयारी
मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना या मेळाव्यात देण्यात आल्या. 'एका घरात दोनशे मतदार, मुलीचं वय १२४ तर वडिलांचं ४३, हा काय प्रकार आहे?', अशा शब्दात राज ठाकरे यांनी मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. महाविकास आघाडीसह (MVA) मनसेने यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पुराव्यांसह तक्रार केली होती. आजच्या मेळाव्याचं नाव 'मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळावा' असं ठेवण्यात आलं होतं, ज्यावरून मनसेने मतदार याद्यांच्या मुद्द्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते. या मेळाव्याद्वारे, ग्राउंड लेव्हलपासून म्हणजेच शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांना मतदार यादी तपासणीचे आदेश देत मनसेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















