एक्स्प्लोर
Voter List Scam : 'मतदार यादीत भरपूर बोगस मतदार', MNS नेते Yashwant Killedar यांचा गंभीर आरोप
मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) मनसेचा (MNS) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण मेळावा पार पडला, ज्यामध्ये अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 'दोन हजार चोवीस विधानसभेच्या यादीमध्ये भरपूर बोगस मतदार, दुबार मतदार, मयत मतदार आणि शिफ्ट झालेले मतदार आहेत,' असा गंभीर आरोप मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. या मेळाव्यात मतदार याद्यांमधील त्रुटी शोधून काढण्यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विशेष सूचना दिल्या. मतदार यादीतील घोळ शोधण्यासाठी येत्या पंधरा दिवसांचा एक विशेष टास्क देण्यात आला आहे. मनसेने यापूर्वीच मतदार याद्यांमधील त्रुटींसंदर्भात पुराव्यांसह राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर आणि मीरा भाईंदरसह MMR भागातील पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर
Advertisement
Advertisement






















