MNS : हेल्थप्राईम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला मनसेचा दणका
MNS : हेल्थप्राईम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला मनसेचा दणका हेल्थप्राईम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मराठीत संभाषण केल्यामुळं एका कर्मचाऱ्याला हटकणाऱ्या एचआर डायरेक्टरला मनसे कार्यकर्त्यांनी सज्जड दम भरला. धक्कादायक बाब म्हणजे एचआर डायरेक्टर स्वत: मराठीभाषिक असूनही त्यानं कंपनीत हिंदी किंवा इंग्रजीत बोलायला हवं, अशी अरेरावीची भाषा केली. मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक आणि विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी त्या एच आर डायरेक्टरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची फोटोफ्रेम भेट म्हणून दिली. हेल्थप्राईम सर्व्हिसेस ही बहुराष्ट्रीय कंपनी असून, ती कंपनी अमेरिकेतील विमा प्रक्रिया मुंबईतून हाताळते. मनसेनं या कंपनीकडून लेखी माफीनाम्याची मागणी केली असून, तसं न झाल्यास २७ फेब्रुवारी या मराठी भाषादिनी सर्व कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचे धडे शिकवण्याचा उपक्रम घेऊ असं सांगितलं आहे.