MLA Disqualification : घटना दुरूस्तीकरून मुख्य नेतेपद निर्माण केलं - राहुल शेवाळे
MLA Disqualification : घटना दुरूस्तीकरून मुख्य नेतेपद निर्माण केलं - राहुल शेवाळे आमदार अपात्रता सुनावणीत आज खासदार राहुल शेवाळेंची साक्ष झाली. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून मुख्य नेतेपद निर्माण केलं, राहुल शेवाळे यांचा उलट तपासणीत दावा केलाय. 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती झाल्याचं शेवाळे आपल्या साक्षीत म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, काँग्रेस राष्ट्रवादीशी शिवसेनेची आघाडी, त्याला पक्षांतर्गत विरोध यांवरून शेवाळेंना सवाल विचारण्यात आले. उद्धव ठाकरे कोणत्याही नेत्यांना तेव्हा भेटत नव्हते असं शेवाळेंनी आपल्या साक्षीत म्हटलंय. २५ जूनला उद्धव ठाकरेंना भेटून सर्व खासदारांनी एनडीएसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती असं शेवाळेंनी म्हटलंय.





















