एक्स्प्लोर
MHADA MLA MP Homes | आमदार-खासदारांना ९.५ लाखात घरं, सर्वसामान्यांच्या वाट्याला काय?
मुंबईत स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांचे लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे असते. आता म्हाडाने सर्वसामान्यांसोबतच आमदार आणि खासदारांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील घरे उपलब्ध केली आहेत. आमदार आणि खासदारांसाठी राखीव असलेल्या या घरांची किंमत अवघी साडेनऊ लाख रुपये आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजाराहून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीत नियमानुसार वेगवेगळ्या राखीव गटांप्रमाणेच आजी-माजी आमदार आणि खासदारांसाठी पंच्याण्णव (95) घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. यामध्ये कल्याणमधील एका घराचा समावेश आहे, ज्याची किंमत केवळ नऊ लाख पंचावन्न हजार आठशे रुपये (₹9,55,800) आहे. हे घर अत्यल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या आजी-माजी आमदार आणि खासदारांसाठी राखीव आहे. यामुळे 'अत्यल्प उत्पन्न गटातील आमदार खासदार कोण? आणि सर्वसामान्यांच्या वाटेची घरं या आमदार खासदारांना दिली जात आहेत का?' असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
आणखी पाहा





















