एक्स्प्लोर
Massive Fire: रबाळे MIDC मध्ये भीषण आग, 'Jell Pharmaceutical' कंपनी जळून खाक
नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी (Rabale MIDC) परिसरातील एका फार्मास्युटिकल कंपनीला भीषण आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. रबाळे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर R/N 952 येथील जेल फार्मास्युटिकल्स (Jell Pharmaceuticals) या कंपनीमध्ये ही आग लागली आहे. ही मेणाचे साहित्य बनवणारी कंपनी असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच ऐरोली, वाशी आणि आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आगीचे कारण अस्पष्ट असून, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement

















