(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Highcourt On Gunratn Sadavarte : मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु असताना बिग बॉसमध्ये, सदावर्तेच गायब
Highcourt On Gunratn Sadavarte : मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु असताना बिग बॉसमध्ये, सदावर्तेच गायब
डॉ. गुणरत्न सदावर्तेंच्या वर्तनावर हायकोर्टाची तीव्र नाराजी "मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसलेत", इतर वकिलांकडून हायकोर्टाला माहिती या प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्यचं नाही का?, आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले?, हायकोर्टाचा सवाल मराठा आरक्षणाला विरोध करणा-या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला, आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही - हायकोर्ट पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ करणार युक्तिवाद मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब