एक्स्प्लोर
OBC Reservation Meeting : चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ओबीसी उपसमितीची आज पहिली बैठक
ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात निर्माण झालेल्या चिंतेवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाणपत्रे देण्यासाठी शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयातील काही शब्दांवर ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे ओबीसीमधील लहान घटकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या GR बाबत स्पष्टता मागितली आहे. मनोज जरांगे यांनी या GR ला मराठ्यांसाठी महत्त्वाचे म्हटले आहे आणि सरकारला 'हेराफेरी' न करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासंदर्भातला GR रद्द होईपर्यंत ओबीसी उपसमितीला मानणार नाही अशी भूमिका घेतली आहे. हाके यांनी ओबीसी उपसमितीला सरकारचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न म्हटले आहे. त्यांनी भुजबळांच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे सांगितले. हाके यांनी सरकारवरचा विश्वास गमावल्याचे म्हटले आहे. "आम्हाला प्रत्येकवेळी कोर्टात जाऊनच जर आम्हाला अशी लढाई लढता लढाई लागत असेल तर आमचा या शासनावरचा विश्वास ओढालेला आहे," असे हाके यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















