Special Report Manoj Jarange : विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची चाचपणी : मनोज जरांगे
Special Report Manoj Jarange : विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची चाचपणी : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचं शस्त्र हाती घेऊन उभे ठाकलेल्या मनोज जरांगेंच्या फॅक्टरचा लोकसभेच्या निकालावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय. जरांगेंमुळे महायुतीला जबरी फटका सहन करावा लागला... अशातच, आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याबाबतही जरांगे चाचपणी करतायत... पाहूयात, तसं झालं तर, त्याचे नेमके काय परिणाम होतील? या स्पेशल रिपोर्टमधून... खरंतर, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जरांगे फॅक्टर आणि मराठा मतांचा मोठा परिणाम झाल्याचं उभ्या महाराष्ट्रावे पाहिलंय. मुख्यत: मराठा आरक्षणात सरकारची भूमिका धरसोड वृत्तीची असल्याचा संदेश गेल्यामुळे महायुतीला आणि भाजपला त्याचा मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय. जरांगे फॅक्टरचा धक्का, पराभवावर शिक्का परभणीत भाजपच्या तिकिटावर लढलेले महादेव जानकर पराभूत झाले. तर बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडेंच्या पदरी पराभव पडला तसेच, जालन्यात पाचवेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंनाही पराभवाचा सामना करावा लागला. नांदेडमध्ये तर अशोक चव्हाणांसारखा नेता सोबत असूनही भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा दारूण पराभव झालाय. हिंगोलीतही शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबुराव कदम यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर तिकडे धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचा पराभव झालाय. लातूरमध्येही भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंवर पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.