(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Protest for Mango : आंबा बागायतदारांना न्याय मिळत नाही तोवर घरांवर काळे झेंडे लावत सरकारचा निषेध करू
मागील 5-6 वर्षांपासून कोकणावर येत असलेल्या हवामान बदलाच्या संकटामुळे अनेक आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. उद्याला आंबा बागायतदार संपूर्ण कर्जमाफीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. कोकणातील हजार ते बाराशेच्या संख्येने राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकरी दाखल होणार आहेत. आंबा बागायतदारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत घरांवर काळे झेंडे लावत सरकारचा निषेध करणार आहेत. मागील २ वर्षात आलेल्या वादळांमुळे आणि मोहोर आल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी ह्यात कर्ज काढली होती आणि हे कर्ज अनेक जण फेडू शकत नसल्यानं तो मेटाकूटीला आलाय. अशातच कोकणातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्याला कर्जातून बाहेर काढण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे असल्याचं आंबा बागायतदार म्हणालेत. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी.