एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision 2021 : लोकशाही आज ठोकशाहीकडे चालली आहे; Medha Patkar यांचं व्हिजन

#MedhaPatkar #ABPMajha #MajhaMaharashtraMajhaVision

Majha Maharashtra Majha Vision : लोकशाही आज ठोकशाहीकडे चाललेली दिसत आहे, असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. मेधा ताई एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी या कार्यक्रमात बोलत होत्या. जयप्रकाश नारायण यांची चळवळ, दलित, आदिवासी, श्रमिकांच्या चळवळी महाराष्ट्रानं जवळून पाहिल्यात. समाज या चळवळीकडे कसा पाहतो यापेक्षा शासन याकडे कसं पाहतंय हे महत्वाचं आहे. कारण आता देशाला 75 वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून. या काळात जो काही संवाद जनता आणि सरकार यात होत होता, तो पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम केंद्रातील सरकारकडून होत आहे. म्हणून आज चळवळींना अवकाश मिळावा, चळवळींना लोकशाहीत स्थान मिळावं म्हणूनच चळवळ करण्याची गरज आज गरीब, मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना जाणवत आहे, असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं. 

मेधाताई म्हणाल्या की, चळवळी हा एक स्तंभ आहे. ही एक लोकशाही मूल्याची चौकट आहे. मूल्यांच्या चौकटींवर नवीन धोरणांमुळं हल्ले होत आहेत. देशातील भूकेली, तहानलेली कष्टकरी माणसं चळवळींचा मार्ग अवलंबतील. मात्र त्या चळवळी दडपल्या जात आहे. जनचळवळींशी संवाद केंद्रीय सरकार संपुष्टात आणत आहेत. त्यासाठी ते कोरोनाचा वापर करत आहेत. त्यासाठी ते वेगवेगळे व्हायरस तेच सोडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. 

महापुरुषांची स्वप्न आपल्या सत्तेसाठी हे लोक धुळीस मिळवत आहेत. चळवळीशिवाय खरं राजकारण, समाजकारण चालू शकणार नाही. आताही काही आंदोलन स्वातंत्र्याच्या चळवळींसारखीच होत आहेत. यात काही जण हौतात्म्य देखील पत्करत आहेत. चळवळींनी व्यापक समन्वयाची दिशा स्वीकारली आहे.  आमचा स्वार्थ आमच्या समाधानात आहे. आम्ही आंदोलनजीवी आहोतच. कुणी त्याला शिवी म्हणून दिली असेल तरी ती आमच्यासाठी देणगीच आहे, असं मेधाताई पाटकर म्हणाल्या. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget