Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7 October 2023 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7 October 2023 : ABP Majha
हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. इंदापूर मधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार.
पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट, पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवारांना निमंत्रण.
बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल करणार 10 तारखेला शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार, पटेल यांची प्रतिक्रिया.
एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली पण ती त्यांनाच घातक ठरणार, एक घाव केला आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव देऊ, बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकारांकडून, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार. मंत्री दीपक केसरकरांची माहिती.
नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसला 32 वर्षानंतर विदर्भाला लीडरशिप मिळतेय. त्यामुळे काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागांवर लढाण्याची तयारी करतोय काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी प्रतिक्रिया.