एक्स्प्लोर

Nitin Gadkari: 'मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन'; नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना दिली होती धमकी

Nitin Gadkari in Nagpur: नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. नितीन गडकरी यांनी मेळघाटातील वनखात्याच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा किस्सा सांगितला

नागपूर: कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते नितीन गडकरी हे कायमच चर्चेत असतात. आतादेखील ते अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप (BJP) युतीचे सरकार असताना सरकारी अधिकारी काम करत नव्हते. त्यावेळी आपण अधिकाऱ्यांना काम करुन घेण्यासाठी धमकावले होते. मी पूर्वी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा मी चळवळीत (Naxal Movement) गेलो तर तुम्हाला गोळ्या घालेन, असा सज्जड दम आपण सरकारी अधिकाऱ्यांना भरल्याचा किस्सा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितला. ते रविवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी नितीन गडकरी यांनी मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा उपस्थितांना सांगितला. त्यांनी म्हटले की,  त्यावेळी डॉ. अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यावेळी मी राजदूत दुचाकीवरुन मेळघाटातील गावांमध्ये फिरलो. तेथील रस्त्यांची परिस्थिती खराब होती. तरीही वनखात्याचे अधिकारी रस्ते बांधायचे काम करुन देत नव्हते. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले. एवढी लहान मुलं कुपोषणाने मरत आहेत, तुम्हाला काही वाटत कसे नाही? तुम्ही रस्ते बांधायला परवानगी का देत नाही?, असे मनोहर जोशींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना विचारले. त्यानंतर मी मनोहर जोशी यांना म्हटले की, तुम्ही हा विषय माझ्यावर सोडा, मी बघतो काय करायचंय ते. त्यावेळी मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो. मी चुकून राजकारणात आलो. परंतु, आता मी पुन्हा नक्षलवादी चळवळीत गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत जे जे केलंय, ते इकडे सांगू शकणार नाही. या सगळ्यानंतर मेळघाटातील रस्त्यांचे काम पूर्ण झाले, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

सरकारमध्ये चांगल्या माणसाला सन्मान नाही: नितीन गडकरी

सरकारी प्रक्रियेत एखाद्याला अधिकाऱ्याला शिक्षा करायची असली की ते फार कठीण काम आहे. कारण एखाद्याने ती फाईल दाबून धरली ती फाईल वर जात नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सरकारची व्याख्याही सांगितले. ते म्हणाले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही म्हणजे सरकार, असे गडकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री नितीन गडकरींशी बोलायचे, विकास ठाकरेंचा खळबळजनक दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Embed widget