एक्स्प्लोर
Mahayuti Rift: 'धंगेकर हा म्होरा, त्याला मालमसाला पुरवणारे हात वेगळे', Sanjay Raut यांचा खळबळजनक दावा
पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding) जमीन व्यवहार प्रकरणावरून महायुतीमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muraleedhar Mohol) यांच्यातील वादामुळे शिवसेना आणि भाजप या सहकारी पक्षांमध्ये संघर्ष पेटला आहे. 'धंगेकर हा म्होरा आहे, धंगेकरांना मालमसाला पुरविणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलाविक जे सरकारमध्ये बसलेले आहेत,' असा खळबळजनक दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दुसरीकडे, मोहोळ यांच्यावरील आरोपांमधून माघार घेण्यास धंगेकर यांनी नकार दिला असून, 'काहीही किंमत मोजावी लागली तरी मी लढणार,' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वादामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, मंत्री उदय सामंत यांनी धंगेकरांशी चर्चा करून सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















