एक्स्प्लोर
Voter List Row : Raj Thackeray यांना भूमिपूत्रच दुबार मतदार दिसतात का? Ashish Shelar यांचा सवाल
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून विरोधी पक्षांवर, विशेषतः राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय, हिंदू माणूसच दिसतोय,' असा थेट सवाल शेलार यांनी केला. शेलार यांनी आरोप केला की, कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed), साकोली (Sakoli) आणि इस्लामपूर (Islampur) यांसारख्या मतदारसंघांमध्ये दुबार मतदारांचा फायदा विरोधी पक्षांना झाला आहे. त्यांनी शबनम शेख, रुबीना शेख आणि अझर शब्बीर शेख यांसारख्या नावांची उदाहरणे देत मतदार यादीतील घोळ समोर आणला. एकाच व्यक्तीची नावे, वडील-मुलाची नावे आणि ओळखपत्रांचे क्रमांक वेगवेगळे असल्याचे पुरावे त्यांनी सादर केले. भोईर, पाटील आडनावाचे दुबार मतदार तुम्हाला दिसले नाहीत का, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















