उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? आज चंद्र दिसतोय का ते बघा? ते कोणत्या गावाला गेले ते शोधा? असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.
Aaditya Thackeray on Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दावोसला (Davos) गेलेत,पण ते उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? आज चंद्र दिसतोय का ते बघा? ते कोणत्या गावाला गेले ते शोधा? असे म्हणत युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टोला लगावला. दावोसमधून जर राज्यासाठी काही मोठं येत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करु. पण मागील दावोस दौऱ्यात जो खर्च करण्यात आला, जी उधळपट्टी झाली ती होऊ नये असेही आदित्य ठाकरे म्हणाले. सह पालकमंत्री म्हणजे ते त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री आहेत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी महायुतीला लगावला.
बांगलादेशी विरोधात हे मोर्चा काढतात तरीपण ते आले कसे?
संतोष देशमुख प्रकरणी देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराडला हे पकडू शकले नाही, तो शरण आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पण सैफ प्रकरणात पोलिसांना मोकळीक दिली तर ते कसे काम करु शकतात याचं उदाहरण आपण काल पाहिलं आहे. पोलिसांचा आम्ही अभिनंदन करतो असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 10 वर्ष झालं भाजप सरकार आहे. बांगलादेशी विरोधात मोर्चा काढतात तरीपण हे घुसखोर बांगलादेशी आले कसे? आपलं केंद्र सरकार काहीच करू शकत नाही का? हे आरोपी बांगलादेशी राहत कुठे? तर ठाणे शहरात असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
पालकमंत्रीपदावरुन शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा
पालकमंत्रीपदावरुन शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळाल्याने भाजपचे आमदार भरत गोगावले नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत महाराष्ट्र युतीतील शिंदे गटाची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त झाली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले नाही. त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उदय सामंत म्हणाले आहे. दरम्यान, त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गोगावले आणि भूसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताराच्या दरेगावी गेल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या: