आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरला, बेकायदा जलवाहतूक बंद करण्याची मागणी
उजनी धरण दुर्घटनेतील सर्व मृतदेह गावाच आणताच आक्रोश आणि हुंदक्यांनी परिसर हादरला. झरे गावातील एका पूर्ण कुटुंबांचा यामध्ये अंत झाला आहे. पती पत्नी आणि दोन चिमुरड्यांचा यामध्ये समावेश आहे.
![आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरला, बेकायदा जलवाहतूक बंद करण्याची मागणी Ujani dam boat accident dead body entered in Zare village mourning in the village Ujani Dam Boat capsized update news आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरला, बेकायदा जलवाहतूक बंद करण्याची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/80c96abb18cc35dedf439424590139811716457122540339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ujani Dam Boat capsized update news : उजनी धरणाच्या (Ujani Dam) जलाशयात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 21 मे रोजी रात्री धरणात बोट बुडून सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय. यामध्ये बुडालेले सर्व सहा प्रवाशी हे करमाळा (Karmala) तालुक्यातील आहेत. यामध्ये दोन प्रवाशी हे कुगावमधील तर चार प्रवाशी हे झरे या गावातील आहेत. आज सर्व मृतदेह NDRF च्या हाती लागले आहेत. दरम्यान, हे सर्व मृतदेह गावाच आणताच आक्रोश आणि हुंदक्यांनी परिसर हादरला आहे. झरे गावातील एका पूर्ण कुटुंबांचा या घटनेत अंत झाला आहे. पती पत्नी आणि दोन चिमुरड्यांचा यामध्ये समावेश आहे.
झरे गाव आणि परिसरावर शोककळा
घटनेची माहिती मिळतात झरे गाव आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी झरे गावातील एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत. या घटनेतून पोलीस अधिकारी राहुल डोंगरे हे वाचले आहेत. ते पोहत किनारी आल्यामुळं त्यांचा जीव वाचला आहे.
बेकायदा जलवाहतूक बंद करा, ग्रामस्थांची मागणी
दरम्यान, या दुर्घटनेनंतर बेकायदा जलवाहतूक बंद करा अशी मागणी झरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मृत कुटुंबांना आर्थिक मदत द्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या बोटीमध्ये जर सर्व सुविधा असत्या तर हे सर्व प्रवासी वाचले असते असं ग्रामस्थांनी सांगितलं. शासनाने या सर्व बोटी अधिकृत कराव्यात. अनाधिकृत बोटी बंद कराव्या अशी मागणी झरे गावातील ग्रामस्थांनी केली. सुविधा असत्या तर ही दुर्घटना घडली नसते असे ग्रामस्थ म्हणाले.
जाधव कुटुंबाला सरकारनं आर्थिक मदत करावी
जाधव कुटुंबाला सरकारनं मदत केली पाहिजे. गोकूळ जाधव यांचे आई वडिल वयस्कर आहेत. ते छकले आहेत. गोकूळ यांच्या जाण्यानं घरातील कर्ता पुरुष गेला आहे. त्यामुळं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सरकारने बोटीने प्रवासाची योग्य सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय. पूर्ण गाव शोकाकूल आहेत. आमच्या गावात चुलही पेटली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
बेकायदा जलवाहतुकीबाबत कठोर भूमिका घेणार : तहसीलदार
दरम्यान, उजनी धरण दुर्घटनेसंदर्भात एबीपी माझाने करमाळ्याच्या तहसीलदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, सर्व मृतदेह मिळाले आहेत. धरणामध्ये जी बेकायदा जलवाहतूक सुरु आहे, त्याबाबत कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल 40 तासानंतर उजनीतील शोधकार्य संपलं, सहावा मृतदेह सापडला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)