एक्स्प्लोर

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: आधी भेट घेतली, आता कौतुकाचा वर्षाव; उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधील वितुष्ट दूर होण्याचे संकेत?

मुंबई: गेल्या अडीच-तीन वर्षांमध्ये एकमेकांवर यथेच्छ टीका आणि आरोप केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निर्माण झालेले वितुष्ट कमी होऊ लागल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपने प्रचंड मोठे यश मिळवले होते. यानंतर 'एक तर मी राहीन, नाहीतर तू राहशील',अशी भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा दृष्टिकोन कमालीचा बदलला होता. हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेत उद्धव ठाकरे यांनी त्याची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका कृतीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या आणि महायुतीच्या नेत्यांवर आग ओकणाऱ्या दैनिक 'सामना'तील अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चक्क कौतुक करण्यात आले आहे. हा प्रकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात राबवलेल्या धोरणांचे 'सामना'च्या अग्रलेखातून कौतूक करण्यात आले आहे. 'नक्षलवाद्यांचा जिल्हा' याऐवजी गडचिरोलीला 'पोलाद सिटी' ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे, असे अग्रलेखात म्हटले आहे. तसेच 'देवाभाऊ, अभिनंदन!' हा अग्रलेखाचा मथळाही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये बीडमधील गुन्हेगारीचा पुसटसा उल्लेख असला तरी उर्वरित अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे हा अग्रलेख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय? 

गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे तर पहिला जिल्हा म्हणून ओळखला जावा, यासाठी फडणवीस प्रयत्न करणार आहेत. ते चुकीचे नाही. फक्त गडचिरोलीच्या विकासाचा हा ‘विडा’ आपण तेथील सामान्य जनता आणि गरीब आदिवासी यांच्यासाठीच उचलला आहे, कोणा खाणसम्राटांसाठी नाही, हे दाखवून देण्याची काळजी देवाभाऊंना घ्यावी लागेल. तरच नवीन वर्षाच्या सूर्योदयापासून गडचिरोलीच्या परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, हा त्यांचा वादा खरा होईल. बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षात कामाला सुरुवात केली व त्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याची निवड केली. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मलईदार खाती आणि विशिष्ट जिल्ह्याचेच पालकमंत्रीपद मिळावे यासाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले व त्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीमध्ये घालवला. नुसताच घालवला नाही, तर अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन केले. काही प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्या वेळी बोलताना त्यांनी गडचिरोलीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा हवाला दिला. मुख्यमंत्री म्हणाले तसे खरेच होणार असेल तर ते फक्त गडचिरोलीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच सकारात्मक म्हणावे लागेल. प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य जनता, गरीब आदिवासी यांच्यासाठी तर खरोखरच हा दिवस कलाटणी देणारा ठरेल. 

विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीमधील हे चित्र बदलायचे ठरवले असेल तर आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. गडचिरोलीच्या या आधीच्या पालकमंत्र्यांनीही त्या ठिकाणी ‘मोटरसायकल’वरून वगैरे अनेकदा फेरफटके मारले होते. तथापि, त्यांचे हे फेरफटके तेथील आदिवासींच्या विकासापेक्षा ठरावीक खाणसम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते, असे आरोप तेव्हा उघड उघड केले गेले. तथापि, ‘संभाव्य पालकमंत्री’ फडणवीस मात्र गडचिरोलीमध्ये नवे काही तरी करतील, तेथील आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करतील, असे एकंदरीत दिसत आहे, असा विश्वास 'सामना'च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत; जवानांसोबत संवाद, नक्षलचळवळ संपवण्यासाठी मोठं पाऊल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशीABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP MajhaTop 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Embed widget