Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तर
Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन आरोपींच्या अटकेची व फाशीच्या शिक्षेची मागणी करत मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड, परभणीनंतर पुणे शहरातही संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाषण करताना आमदार सुरेश धस यांनी बीडमधील नेते व मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhanajay Munde) गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरच खंडणीचा आकडा फायनल झाल्याचं धस यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांनी आरोप करताना थेट धनंजय मुंडेंचं नाव न घेता, आकाचे आका असं म्हटलं. त्यामुळे, सध्या आका आणि आकाचे आका हा शब्दप्रयोग राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. आमदार धस (Suresh dhas) यांनी आणखी एक शब्दप्रयोग केला आहे. विशेष म्हणजे हाही शब्दप्रयोग करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घेतलं आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादीत बडी मुन्नी आहे, ती अमोल मिटकरीला बोलायला लावते, असे म्हणत धस यांनी आणखी नेता त्यांच्यास्टाईलने कोड्यात ठेवला आहे.