एक्स्प्लोर
Local Body Polls: हायकोर्टात याचिकांवर सुनावणी सुरू, तर निवडणूक आयोग आजच निवडणुकांची घोषणा करणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना (Local Body Elections) आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी सुरू झाली आहे. 'मतदार यादीतील घोळ, प्रभाग आरक्षण आणि सीमांकन' या प्रमुख मुद्द्यांवर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातून वर्ग करण्यात आलेल्या याचिकांसह एकूण ४२ याचिकांवर मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी पार पडत आहे. एकीकडे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे न्यायालय काय आदेश देणार आणि आयोग काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















