एक्स्प्लोर
Sikandar Shaikh Bail: 'सिकंदर शेखला जामीन मंजूर', Punjab Police च्या कारवाईनंतर कुस्ती विश्वाला मोठा दिलासा
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला (Sikandar Shaikh) पंजाबमधील शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) पपला गुर्जर (Papla Gurjar) टोळीला शस्त्र पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह इतर चौघांना अटक केली होती, ज्यामुळे कुस्ती विश्वात खळबळ उडाली होती. 'सिकंदर शेख महाराष्ट्राचा आणि देशाचाही मोठा पैलवान असल्याचं पटवून दिल्यानंतर त्याला जामीन मिळणं शक्य झालं', अशी माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी इतर तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, मात्र सिकंदरच्या नावावर कोणताही गुन्हा नोंद नव्हता, ही बाब जामिनासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या अटकेनंतर सिकंदरला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















