Maharashtra Fishermen News : मच्छिमारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी; 40 वर्षांनंतर नवा कायदा
आता राज्यभरातल्या मच्छिमारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी.. बातमी आहे ४० वर्षांनंतर अस्तित्वात आलेल्या नव्या कायद्याची.... नव्या कायद्यानुसार एलईडी आणि पर्सेसीन मासेमारी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. विनापरवाना मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी बोटीच्या मालकास ५ लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार एलईडी आणि बूल ट्रॉलींगद्वारे मासेमारी करणाऱ्यांना 5 ते 20 लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. हा नवा कायदा पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचा ठरणार असल्याचं मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख म्हणाले. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैधरित्या घुसून मासेमारी करणाऱ्यांवर अंकुश लावण्याचं कामही हा कायदा करणार आहे....





















