Maharashtra Farming : चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
Maharashtra Farming : चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नका; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केलीये. मात्र सध्या पाऊस नियमित नाहीय. याबरोबरच अनेक ठिकाणी पावसात मोठा खंड पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड करू नये, असा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांनं राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय. बाईट : डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. ग्राफिक्स : पेरणी करतांना ही घ्या काळजी पेरणी करतांना 90 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणी करत असताना 2 ते 4 सेंटीमीटर अंतरावर वरच करावी जेणेकरून जास्त खोलात पेरणी झाल्यास त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. गरजेनुसार स्फुरद आणि पालाश एकरी 8 ते 10 किलोचा वापर केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो." 'जमीन थंड झाल्याशिवाय पिकांची लागवड करू नये'. कमी कालावधीच्या पिकांची पेरणी लवकर करावी' पिकानुसार जमीनीची निवड करावी.