Maharashtra Dam Water Level : धरण तळाशी, तहान गळ्याशी; हे वरूणराजा, असशील तिथून लगेच ये...!
अख्खा महाराष्ट्र तुझ्या आठवणीने व्याकूळ झालाय... इकडे तू उद्या येण्यार असल्याची वर्दी देण्यात आलीय... तशी ती आधीही दिली होतीच, पण तेव्हा तू चकवा दिलास... असो, उद्या तरी नक्की ये बाबा... आणि जमलं तर लवकर येता आलं तर बघ... आधीच उशीर केलायस... आणि आलास की चांगला चारेक महिने मुक्कामालाच ये... असं म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्रावर आलीय. कारण, इथं रानं करपलीयत... विहिरींमध्ये खडखडाट झालाय... धरणांची पोटं उघडी पडलीयत... चार-दोन वर्षांआधीची झाडं पानं गळल्यामुळे अकाली म्हातारी झालीयत. तर कधीकाळी हिरवेकंच दिसणारे डोंगरे अक्षरश: बोडके झालेयत शहरांतील रस्त्यांवर उन्हाच्या लाह्या तडतडतायत तर गावा-गावांतील रस्त्यांवर निव्वळ धूरपेरणी होतीय... इतकंच कायतर, वरूणराजा तू जर इतक्यात आला नाहीस, तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न, जगणं मुश्कील करणारेय. म्हणून, हे वरूणराजा... तू ये... आम्ही तुझ्या स्वागताला छत्र्या, रेनकोट, कांदाभजी आणि वाफाळता चहा घेऊन सज्ज आहोत...
२४ आणि २५ जूनपासून पावसाचा जोर वाढेल,हवामान विभागाचा अंदाज, विहिरी, धरणं आटल्यानं पाण्याचं मोठं संकट, नद्याही कोरड्याठाक
![ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/11f2b9f450c0313743f0d3c99f483e0a1739856153351976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Supriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f8c5e5fbb2ac939549d8d22cdbf082291739854939150976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/e59d7b7dbf43942e5b0fa8881c95050f1739853234226976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/843e4f65576dd484534735d492504d611739851251708976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrahar Patil : एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्या; चंद्रहार पाटलांची मागणी, उपोषण करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/d1eda431d5830f5880bcaf3dc58143671739849341579976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)