Maharashtra Corona Updates : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ ABP Majha
राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होऊ लागलाय. कारण मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागलीय. राज्यात काल दिवसभरात तब्बल २ हजार १७२ नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर मुंबईत काल १ हजार ३७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. सोमवारी मुंबईत कोरोनाचे ८०९ नवे रुग्ण आढळले होते. मात्र मंगळवारी ५०० हून अधिक रुग्णांची भर पडली तर ३३८ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबईत १ हजार ३७७ रुग्ण आढळल्यानं राज्याचा आकडा मोठ्या असण्याची शक्यता आहे... त्यामुळे महाराष्ट्र, मुंबईवर सैल झालेला कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होताना दिसतोय.. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन एबीपी माझा करतंय.

















