एक्स्प्लोर
Maharashtra मनसेकडून अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मौन सोडलं!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हरीशवर्धन सकपाळ यांनी 'मतचोरी' आणि मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. 'ज्योतिषशास्त्राच्या आधारावर अशा प्रश्नाला उत्तर देणं बरोबर होणार नाही', असे म्हणत सकपाळ यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चेवर अधिक बोलण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की 'वोट चोर गद्दी छोड' हा मुद्दा सर्वप्रथम राहुल गांधी यांनीच उचलून धरला होता आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील डुप्लिकेट नावांची यादी तयार केली आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात उपस्थित होते, तर सकपाळ स्वतः पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत होते. इंडिया आघाडीची स्थापना संविधान संरक्षणासाठी झाली असून, आघाडीत नवीन पक्षाचा समावेश करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर सर्व घटक पक्ष मिळून घेतील असेही त्यांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















