Maharashtra Budget 2023 : शिंदे फडणवीस सरकारचा पंचामृत अर्थसंकल्प, घोषणांचा पाऊस
Maharashtra Budget 2023 : शिंदे फडणवीस सरकारचा पंचामृत अर्थसंकल्प, घोषणांचा पाऊस
कृषी, महिला, पायाभूत सुविधा, रोजगार आणि पायाभूत विकास अशी पंचसूत्री असलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामागे फडणवीसांनी पंचामृत अर्थसंकल्प अशी संकल्पनाही सांगितलीय. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीतला पहिला अर्थसंकल्प आज सादर केलाय. दहा महिन्यांआधी महाराष्ट्रात थरारक राजकीय नाट्य घडलं, इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं आणि शिंदे फडणवीसांचं सरकार आलं. त्यानंतरचाही हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह इतरही पालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतांची बेगमी करायची तर, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला खूश करण्याचं कसब साधण्याचं आव्हान सरकारपुढे होतं. हेच आव्हान लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प माडल्याचं बोललं जातंय.