Maharashtra BJP Meeting : कमळ फुलवण्याचा रोडमॅप; भाजपच्या बैठकीत काय ठरलं?
Maharashtra BJP Meeting : कमळ फुलवण्याचा रोडमॅप; भाजपच्या बैठकीत काय ठरलं? देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणताही चर्चा झाली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं आता निश्चित झालेय. विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकर करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवात साधला. विधानसभेसाठी केंद्राकडून फूल सपोर्ट मिळणार असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/558262db898e5ab995ca11de4d5448581739274863509977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/7aabb15f6ee517b364a55c84deffe24a1739271625302977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORY](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e56ebb641a0091cc0adb9d4cb4446481739266860930718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas PC : जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकण्याच कळतं का? धस यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/dd49fa174784ed744dbb96439e80019f1739262206703718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)