Maharashtra Assembly Election : निवडणुका जाहीर! कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती? सविस्तर चर्चा
Maharashtra Assembly Election : निवडणुका जाहीर! कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती? सविस्तर चर्चा
ल्या 15 दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर आज विधानसभा निवडणुकांची तारीख समजली असून राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर केल्या. त्यानुसार, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha) मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, राज्यात दिवाळीनंतर देखील पुन्हा एकदा दिवाळीसारखेच पण राजकीय फटाके फुटणार आहेत. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या (Election) तुलनेत यंदा 1 महिना उशिराने निडणुका पार पडत आहेत. विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ 15 दिवसांत तयारी करावी लागणार आहे. कारण, 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. तर, 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे, राजकीय पक्षांना लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा करावी लागेल. त्यात, मनसे (MNS) व वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेत अनुक्रमे 7 व 21 उमेदवार जाहीर केले आहेत.