एक्स्प्लोर
Maha Governor vs CM| विमान उड्डणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी दिला : मुख्यमंत्री कार्यालय
मुंबई : सरकारी विमानातून प्रवास करण्यावरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाला नवं तोंड फुटलं. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं कळवलं, असं राज्यपाल सचिवालयाने म्हटलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाने आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना विमान वापरण्यात परवानगी मिळाली आहे की नाही याची खातरजमा न केल्यानेच राज्यपालांचा खोळंबा झाला. यात राज्य सरकारची कोणतीही चूक नाही, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने परिपत्रक जारी केलं आहे.मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत मान्यता दिली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करुन न घेतल्याने राज्यपालांना सरकारी विमानाने इच्छित स्थळी जाता आलं नाही. राजभवन सचिवालयाने राज्यपालांबाबत पुरेशी काळजी घेणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही. राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून राजभवानातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.
महाराष्ट्र
Osama on Pakistan: 10-12 वी इथेच,आधार- रेशन कार्डही भारताचं, पाकला निघालेला ओसामा काय म्हणाला?
Colonel Patwardhan Pahalgam Attack : येत्या काही दिवसांत सैन्य दलांच्या कारवाईची अंमलबजावणी दिसेल
Jitendra Awhad : ठाण्यातील प्रति तुळजाभवानी मंदिराचा इतिहास, बांधणी ते निर्माण कार्य
Jalna Adarsh Raut : रेखाचित्रातील दहशतवाद्याने हल्ल्याच्या आदल्या विचारलं... Pahalgam Terror Attack
Umred National Park Tigress Cubs वाघिणीच्या बछड्यांची धमाल मस्ती, उन्हापासून वाचण्यासाठी गारेगार सोय
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement





















