Madhya Pradesh CM : ABVP ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री; Dr. Mohan Yadav यांचा संपूर्ण राजकीय प्रवास
भोपाळ: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आता महाकालनगरी उज्जैनचे आमदार मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या नावाची वर्णी लागली आहे. राज्यात 163 जागांवर अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर भाजपने मोठ्या विचारमंथनानंतर मोहन यादव यांच्यावर विश्वास व्यक्त केला. नवीन मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने शेअर बाजारात 5 कोटी रुपयाहून अधिक रुपयांची गुंतवणूकही केली आहे.
मोहन यादव यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत शेती, व्यवसाय आणि भाड्याचे उत्पन्न आहे. त्यांच्याकडे सुमारे 9 कोटी रुपयांची जंगम आणि 32 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची एकूण संपत्ती 42.04 कोटी रुपये आहे. 2018 च्या निवडणुकीपूर्वी ती 31.97 कोटी रुपये होती. जमीन आणि इतर स्थावर मालमत्तेच्या रूपाने त्यांची बहुतांश संपत्ती वाढली आहे.