एक्स्प्लोर
Laxman Hake : 'निवडणुकीमध्ये सरकारला रोषाला सामोरं जावं लागेल',लक्ष्मण हाके यांचा थेट इशारा
OBC नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी बीडमध्ये (Beed) आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. २ सप्टेंबरचा जीआर (GR) रद्द झाल्याशिवाय ओबीसी स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 'जोपर्यंत हा जीआर रद्द होणार नाही, तोपर्यंत ओबीसी स्वस्थ बसणार नाही आणि ओबीसीच्या मनातला जो संभ्रम आहे तो दूर होणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी यावरती लवकरात लवकर अॅक्शन घ्यावी नाहीतर मग निवडणुका आहेतच समोर,' असा इशारा लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे. आम्ही मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) नाही, तर ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करत आहोत, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका करताना, त्यांना आरक्षणाबद्दल किती माहिती आहे, असा सवाल त्यांनी केला. विजयसिंह पंडित यांच्यावरही टीका करत, बीडमध्ये त्यांनी विष पेरल्याचा आरोप हाके यांनी केला आणि येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे नेतृत्व संपवू, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















