Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे विधानसभेत एकही उमेदवार उभा करणार नाही - हाके
Laxman Hake on Manoj Jarange : मनोज जरांगे विधानसभेत एकही उमेदवार उभा करणार नाही - हाके वडीगोद्री येथे केलेले उपोषण सोडताना सरकारने काही आश्वासने दिली होती. त्याची पुर्तता अद्याप केलेली नाही. - मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला आमचा आक्षेप आहे. शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या? म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळु शकत नाही का? - बोगस कुणबी नोंदीवर आम्ही आक्षेप घेतला होता. त्यावर सरकारने काहीही कारवाई केलेली नाही. - मुख्यमंत्री मनोज जरांगे यांना रेड कार्पेट घालत आहेत. - जरांगे यांच्या शातंता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. - शरद पवार यांनी सर्वपक्षीय तसेच ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्या एकत्रीत बैठक बोलवनाच्या सुचनेचे आम्ही स्वागत करतो. आम्ही या बैठकीला नक्की जाऊ - प्रशासनामार्फत तीन वर्षापासुन नगरपालिका, महापालिका, जिल्हा परीषदेचा कारभार चालवला आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ओबीसींचे हक्क डावलले जात आहे. - मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे.
पवार साहेब तुम्ही ही बैठक लवकरात लवकर बोलवा अन्यथा तुम्ही लोकसभेकरता ओबीसी-मराठ्यांच्या संघर्षावर पोळी भाजून घेतली आहे
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसींचं पंचायत राजमधलं आरक्षण संपलं असेल
त्यानंतर ओबीसी बांधवांनी नंतर म्हणू नका की जेव्हा आरक्षण संपलं तेव्हा तुम्ही कुठे होता
आम्ही केवळ ओबीसींच्या न्याय आणि हक्कांसाठी लढा लढतोय
कुणालाही निवडणुकीत पाडण्याची भाषा करत नाही
आम्ही एवढंच म्हणतो की 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार असलेल्यांच्या बाजूने लोकप्रतिनिधी विधीमंंडळात बोलले का हा जाब आम्ही त्यांना विचारणार आहे
ओबीसींच्या मनात एकच भावना आहे..गेल्या तीन वर्षांपासून राज्यात पंचायत राजच्या निवडणुका झाल्या नाहीत..ही लोकशाही आहे का?
गेल्या तीन वर्षांपासून ओबीसींच्या पंचायत राजमधील आरक्षणासंदर्भात निर्णय अडकला आहे
महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकही आमदार ओबीसींच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही
आणि दुसरीकडे जरांगे पाटलांना करोडोंची खैरात दिली जाते..प्रत्येक शहरात कमानी लावून स्वागत केलं जातं
एकीकडे सगळे आमदार जरांगेंना समर्थन देतात आणि ओबीसींकडे दुर्लक्षही करतात