(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laxman Hake OBC : लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरात दाखल
Laxman Hake OBC : लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरात दाखल
ओबीसी उपोषणकर्त्यांना (OBC Reservation) आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे. थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होईल यानंतर शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) भेटीला वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे.. सरकारच्या शिष्टमंडळात सहा वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ आधी वडीगोद्री इथे जाऊन आंदोलकांशी चर्चा करेल. त्यानंतर शिष्टमंडळ पुण्यात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणेंची भेट घेईल. मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आज आंदोलनाच्या 10 व्या दिवशी हाके आणि वाघमारे उपोषण मागे घेतात का याची उत्सुकता आहे.
भुजबळ यांच्या समवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत नेते आणि अधिकारी येणार आहेत.