Laxman Hake Full Speech : ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याची तरुणांची भावना- लक्ष्मण हाके
Laxman Hake Full Speech : ओबीसींना टार्गेट केलं जात असल्याची तरुणांची भावना- लक्ष्मण हाके
हेही वाचा :
तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिला होता. यावरून भुजबळांनी कावळ्याच्या शापाने गाय मारत नाही, असे प्रत्युत्तर जरांगे पाटलांना दिले. आता यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर दुसरीकडे जालन्यातली वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या 10 दिवसांपासून ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, या मागणीसाठी उपोषण करत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण मागे घेण्यासाठी जालन्यात दाखल झाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये छगन भुजबळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटलांना दिले.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
